वातावरणात गारवा वाढला; अकोल्याचे किमान तापमान १५.९ अंश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:58 IST2017-12-18T23:50:32+5:302017-12-18T23:58:28+5:30
अकोला : पंधरा दिवसांपासून ढगाळ वातवरण असून, गत दोन दिवसांपासून वातावरणात गारवा वाढला. सोमवारी गारव्यात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांनी गरम कपडे बाहेर काढले.

वातावरणात गारवा वाढला; अकोल्याचे किमान तापमान १५.९ अंश!
ठळक मुद्देपंधरा दिवसांपासून ढगाळ वातवरण थंडीचा फायदा हरभरा, गूह पिकाला होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पंधरा दिवसांपासून ढगाळ वातवरण असून, गत दोन दिवसांपासून वातावरणात गारवा वाढला. सोमवारी गारव्यात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांनी गरम कपडे बाहेर काढले.
मागील पंधरा दिवसांपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी झाली होती त थापि सोमवारपासून अचानक गारवा वाढल्याने सायंकाळी ५ वाजतापासूनच थंडी वाढली. किमान तापमान १५.९ अंश होते. या थंडीचा फायदा हरभरा, गूह पिकाला होईल, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, मागील २४ तासांत सायंकाळी ५.३0 वाजेपर्यंत बुलडाण्याचे किमान तापमान १६, तर वाशिमचे किमान तापमान १४ अशंवर होते.