गणपती बाप्पांचे पुन्हा विसर्जन

By Admin | Updated: September 12, 2014 01:09 IST2014-09-12T01:09:53+5:302014-09-12T01:09:53+5:30

गणपती बाप्पांचे पुन्हा विसर्जन; अकोला मनपाचा पुढाकार.

Ganpati Bappa's Immersion | गणपती बाप्पांचे पुन्हा विसर्जन

गणपती बाप्पांचे पुन्हा विसर्जन

अकोला : गणेश घाटांवर विसर्जन न करता थेट पुलावरून विसर्जन केलेल्या गणेश मूर्ती तिसर्‍या दिवशी पाण्यावर तरंगत असल्याचा प्रकार महापालिकेच्या निदर्शनास आला. ही बाब गंभीरतेने घेत, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या आदेशानुसार पाचही गणेश घाटालगतच्या मोर्णा नदीच्या पात्रातील गणेश मू र्तींचे पुन्हा विसर्जन करण्यात आले.
शहरातील लहान-मोठय़ा गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मनपा प्रशासनाच्यावतीने पाच ठिकाणी गणेश घाटांची निर्मिती करण्यात आली होती. गणेश घाटांवर विसजिर्त केलेल्या गणेश मूर्तींचे प्रशासनाने का पशी तलावात पुर्नविसर्जन केले; परंतु ज्या गणेश भक्तांनी निमवाडी परिसर, हिंगणा व हरिहर पेठ येथील गणेश घाटालगत मोठय़ा गणेश मूर्तींर्ंचे विसर्जन केले, अशा मूर्तींचे विसर्जन झालेच नसल्याचे तिसर्‍या दिवशी समोर आले. अनेक मोठय़ा गणेश मूर्ती पाण्यावर तरंगत असल्याचा प्रकार लक्षात येताच पुन्हा मुर्त्यांचे रीतसर विसर्जन करण्यात आले.

Web Title: Ganpati Bappa's Immersion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.