शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील कैद्याजवळ सापडला गांजा

By admin | Updated: February 28, 2015 01:46 IST

कारागृहात गांजाची तस्करी.

अकोला: जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये चार वर्षांपासून कारावासात असणार्‍या कैद्याकडे ३0 ग्रॅम गांजा सापडल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८.३0 वाजता सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. कारागृहामध्ये गांजा सापडण्याची ही चौथी घटना आहे, हे विशेष. कारागृह अधीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांच्यातर्फे कर्मचारी रमेश गव्हाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी कैद्यांची तपासणी केली. यात भादंवि कलम ४९८, ३0६ नुसार चार वर्षांपासून कारावास भोगत असलेला जळगाव जामोद तालुक्यातील जवखेडा येथील संजय भीमराव गवई याची हालचाल संशयास्पद दिसून आल्याने कारागृह शिपायांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १५ ग्रॅम गांजाच्या दोन पुड्या मिळून आल्या. या प्रकरणी कैदी संजय गवईवर कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे कारागृहामध्ये अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याचे सिद्ध होते. कारागृहातील कर्मचार्‍यांच्या मदतीशिवाय कारागृहामध्ये अंमली पदार्थ नेणे शक्य नाही. सहा महिन्यांपूर्वी कारागृहातील एका कर्मचार्‍याला कैद्याकडे गांजा देताना पकडण्यात आले होते आणि त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.