शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पेट्रोल-डिझेलची चोरी करणारी पाच जणांची टोळी गजाआड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 18:35 IST

अकोला: वाशिम मार्गावर पातूर जवळ असलेल्या नॅशनल ढाब्यावर ट्रकमधून पेट्रोल-डिझेलची चोरी करून काळ्या बाजारात त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने सोमवारी मुसक्या आवळल्या.

अकोला: वाशिम मार्गावर पातूर जवळ असलेल्या नॅशनल ढाब्यावर ट्रकमधून पेट्रोल-डिझेलची चोरी करून काळ्या बाजारात त्याची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने सोमवारी मुसक्या आवळल्या. पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून १२0 लिटर डिझेलसह एकूण ३५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला वाशिम मार्गावर पातूर शहरानजिकच्या नॅशनल ढाब्यावर थांबलेल्या पेट्रोल-डिझेल टँकरमधून पेट्रोल-डिझेलची चोरी करून त्याची काळ्या बाजारात काही जण विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. विशेष म्हणजे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नॅशनल ढाब्यावर सापळा रचला आणि ढाब्यावरील चोरट्यांच्या हालचालींवर पाळत ठेवली. सोमवारी दुपारच्या सुमारास एमएच ३0 बीडी 0७२७ क्रमांकाच्या टँकरमधून काहीजण डिझेल काढत असल्याचे विशेष पोलीस पथकाला दिसून आले आहे. या टँकरमध्ये  20 हजार लिटर डिझेल होते. पोलिसांनी अचानक छापा घातला आणि टँकरमधून डिझेल चोरताना, फैय्याज बेग रज्जाक बेग(३२ रा. चाँदखॉ प्लॉट, कब्रस्थान अकोला), अब्दुल जावेद अब्दुल रशिद(३२ रा. मुजावरपुरा पातूर), अकबर खान अख्तर खान(पूरपिडीत कॉलनी, अकोट फैल), विजय सदानंद मौर्य(४0 रा. शंकर नगर अकोट फैल), नाजिमोद्दीन अनिसोद्दीन(२0 रा. जिराबावडी खदान) यांना रंगेहात अटक करण्यात आली. पेट्रोल-डिझेल टँकरमधून तेलाची चोरी करण्याचा गोरखधंदा अनेक वर्षांपासून सुरू होता. परंतु हफ्तेखोरी व आर्थिक हितसंबधांमुळे पातूर पोलिसांनी याकडे जाणीवपुर्वक र्दुलक्ष केल्याचे सोमवारी विशेष पथकाने केलेल्या कारवाईतून दिसून येते. या प्रकरणात पोलिसांनी पातूर पोलीस ठाण्यात जीवनाश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७ नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख मिलिंद बहाकर यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी