कारंजात जनावरे चोरणारी टोळी गजाआड

By Admin | Updated: January 29, 2017 02:47 IST2017-01-29T02:47:03+5:302017-01-29T02:47:03+5:30

गेल्या महिन्यापासून जनावरे चोरणार्‍या टोळीने हैदोस घातला होता.

Gangs carrying animals in cars | कारंजात जनावरे चोरणारी टोळी गजाआड

कारंजात जनावरे चोरणारी टोळी गजाआड

कारंजा लाड, दि. २८: जनावरे चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी ही टोळी २८ जानेवारी रोजी गजाआड केली.
गेल्या महिन्यापासून जनावरे चोरणार्‍या टोळीने हैदोस घातला होता. गत काही महिन्यापासून दहा जनावरे चोरीस गेली होती. याप्रकरणी रमेश मोतीलाल यादव यांच्या फियार्दीवरून २८ डिसेंबर २0१६ रोजी पोलिसांनी शहरातील अस्ताना परिसरातील मोहम्मद इजाज अब्दुल खालिक याला अटक केली होती. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली.

Web Title: Gangs carrying animals in cars