दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:19 IST2021-07-29T04:19:54+5:302021-07-29T04:19:54+5:30

खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा फुले नगर येथील रहिवासी शुभम सुनील इंगळे (वय २५ वर्षे) व विशाल सुरेश गवई ...

A gang of two was deported for two years | दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

खदान पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा फुले नगर येथील रहिवासी शुभम सुनील इंगळे (वय २५ वर्षे) व विशाल सुरेश गवई (वय २६ वर्षे) हे दोघे जण जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून खदान पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. खदान पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र दोन्ही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हा आदेश बुधवारी दिला असून, टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ व खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी आवश्यक ती प्रक्रिया केली.

Web Title: A gang of two was deported for two years