चोरट्यांची टोळी गजाआड; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: June 18, 2014 01:13 IST2014-06-18T01:12:49+5:302014-06-18T01:13:36+5:30

लक्झरी बसमध्ये चोरी करणार्‍या चार जणांच्या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी गजाआड केले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक कार व इतर साहित्य जप्त केले.

Gang of thieves; Three lakhs of money seized | चोरट्यांची टोळी गजाआड; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरट्यांची टोळी गजाआड; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोला : मराठा मंगल कार्यालयासमोर वरात घेऊन आलेल्या लक्झरी बसमध्ये चोरी करणार्‍या चार जणांच्या टोळीला रामदासपेठ पोलिसांनी गजाआड केले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक कार व इतर साहित्य जप्त केले. नागपुरातील बजरंग नगरात राहणारे राजेंद्र एकनाथ घ्यार (४0) हे सोमवारी सकाळी एमएच ३१ डीएस ४३८५ क्रमांकाच्या लक्झरी बसने नागपुरातून वरात घेऊन मराठा मंडळ मंगल कार्यालयात आले. राजेंद्र घ्यार हे दुपारच्यावेळी क्लिनरसोबतच जेवायला गेले असता अज्ञात चार युवक लक्झरी बसमध्ये चढले. युवकांनी बसमधील एलसीडी, साऊंड सिस्टिमचे बॉक्स, रोख १५00 रुपये असलेले पाकीट, आधारकार्ड, मतदारकार्ड, परवाना आदी लंपास करताना रामदासपेठ पोलिसांनी टोळीला रंगेहात पकडले. या टोळीकडून पोलिसांनी सहा एलसीडी, दोन दुचाकी, एक कार म्युझिक सिस्टिम, ८ ते १0 मोबाईल, चारचाकी वाहनांच्या स्टेपन्या असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जैन लॉन्ससमोर उभ्या असलेल्या चार ते पाच कारच्या काचा फोडून त्यातून १.५0 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याचीही या टोळीने कबुली दिली. पोलिसांनी टोळीचा म्होरक्या तारफैलातील सैय्यद वसीम सैय्यद मुनाफ (३0) याच्यासह तीन अल्पवयीन मुलांना अटक केली.

Web Title: Gang of thieves; Three lakhs of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.