जुगार अड्डय़ावर धाड : नऊ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 19:53 IST2017-08-04T19:52:15+5:302017-08-04T19:53:16+5:30
मूर्तिजापूर : तालुक्यातील चिखली (कादवी) येथे सुरू असलेल्या जुगारावर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकून नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह १ लाख ६0 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

जुगार अड्डय़ावर धाड : नऊ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : तालुक्यातील चिखली (कादवी) येथे सुरू असलेल्या जुगारावर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकून नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह १ लाख ६0 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
चिखली (कादवी) येथे जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन पडघन यांच्या नेतृत्वात पो.काँ. मनोहर मोहोड, गणेश पांडे, अय्याज जिलानी, संतोष गवई, गोलचंद लांजेवार, नितीन मगर, संजय भारसाकडे यांनी धाड टाकली. तेथे जुगार खेळताना नऊ जणांना रंगेहात अटक करून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. कारवाई केलेल्यांमध्ये पराग हितांगे, अनिल यदवर, उमेश तिवारी, हितेश होटे, राहुल मनवर, कपिल शितोडे, मदन खरात, पवन यादव, कल्पेश कोळवले यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून रोख ९ हजार ४९0 रुपये, चार मोटारसायकल १ लाख ३0 हजार, १0 मोबाइल २५ हजार, असा एकूण १ लाख ६४ हजार ४९0 रुपयांचा माल जप्त केला आहे. सर्व आरोपींना अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे.