तेल्हारा येथे जुगारावर धाड
By Admin | Updated: July 5, 2016 01:21 IST2016-07-05T01:21:00+5:302016-07-05T01:21:00+5:30
तेल्हारा पोलिसांनी पाच जणांना रंगेहात पकडून अटक केली.

तेल्हारा येथे जुगारावर धाड
तेल्हारा (जि. अकोला): स्थानिक जिजामाता नगरात सार्वजनिक ठिकाणी पत्त्यावर सुरू असलेल्या जुगारावर तेल्हारा पोलिसांनी ३ जुलै रोजी दुपारी ४.४५ वाजता धाड टाकून पाच जणांना रंगेहात पकडून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या १२ (अ) कलमान्वये अटक केली. जिजामाता नगरातील एका सार्वजनिक ठिकाणी बावन्न पत्त्यांच्या जुगारावर धाड टाकून तेल्हारा पोलिसांनी तेथे खेळणारे तेल्हार्यातील सोनू तुकाराम शिंदे, सतीश शंकरराव वाघमोडे, मनब्दा येथील दामोदर शंकर पाथ्रीकर, मुगुटराव देवचंद वानरे, गणेश दिनकर इंगोले अशा पाच जणांना रंगेहात पकडले. त्यांच्याजवळून ५२ ताश पत्ते, २२७0 रुपयांची रक्कम जप्त करून त्यांना अटक केली. सदर कारवाई ठाणेदार नंदकिशोर नागलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामभाऊ भास्कर यांच्या नेतृत्वात हेड कॉन्स्टेबल रवींद्र करणकार, पो.कॉ. विलास अस्वार, विनोद गोलाईत यांनी केली.