गजानन नारे यांच्या मातोश्रींचे देहदान

By Admin | Updated: January 21, 2015 00:56 IST2015-01-21T00:56:17+5:302015-01-21T00:56:17+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदानाने संकल्प पूर्ण.

Gajanan Nare's Matoshree's Dahanan | गजानन नारे यांच्या मातोश्रींचे देहदान

गजानन नारे यांच्या मातोश्रींचे देहदान

अकोला - प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे यांच्या मातोश्री प्रभावती साहेबराव नारे (७३) यांचे मंगळवार, २0 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालय प्रशासनाला त्यांचा मृतदेह सुपूर्द करण्यात आला. शिक्षिका म्हणून आदर्श प्रस्थापित करणार्‍या प्रभावती नारे यांनी देहदान करून समाजाला उत्तुंग कार्याची वाट दाखवली आहे.
प्रभावती नारे या शिक्षिका म्हणून सेवानवृत्त झाल्यानंतर आध्यात्मिक आणि धार्मिक विषयात त्यांनी कार्य केले. स्वभावाने मनमिळावू असलेल्या प्रभावती नारे यांच्या पश्‍चात पती, मुलगा, सून, नातू व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची आदरांजली सभा गुरुवार, २२ जानेवारी रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत तोष्णीवाल ले-आउट येथील प्रभात किड्स स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. प्रभावती नारे यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुपूर्द करताना कागदपत्रे, आवश्यक अटी व इतर सोपस्कार पूर्ण करण्यात आले.

Web Title: Gajanan Nare's Matoshree's Dahanan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.