गजानन घोंगडे तिस-यांदा राष्ट्रीय पातळीवर सन्मानित
By Admin | Updated: April 7, 2015 02:01 IST2015-04-07T02:01:14+5:302015-04-07T02:01:14+5:30
आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धेत पुरस्कार मिळविणारे एकमेव मराठी व्यंगचित्रकार.

गजानन घोंगडे तिस-यांदा राष्ट्रीय पातळीवर सन्मानित
अकोला- व्यंगचित्रकार आणि कॅलिग्राफर गजानन घोंगडे यांना यावर्षीचा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा माया कामत स्मृती राजकीय व्यंगचित्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. त्यांना दुसर्यांदा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. बंगळुरूच्या इंडियन इंस्टिट्यूट ऑफ काटरूनिस्ट या संस्थेतर्फे दरवर्षी व्यंगचित्रकार स्व. माया कामत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एका आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करीत असते. ज्यात देशभरातून अनेक व्यंगचित्रकार भाग घेतात. या स्पर्धेत गजानन घोंगडे यांच्या व्यंगचित्राला ह्यस्पेशल ज्युरी अवॉर्डह्ण प्राप्त झाला. विशेष म्हणजे यावेळीही हा पुरस्कार मिळविणारे ते देशातील एकमेव मराठी व्यंगचित्रकार ठरले आहेत. यापूर्वी २0१0 सालचा माया कामत स्मृती राजकीय व्यंगचित्रकारिता पुरस्कार त्यांना मिळाला होता. २0१४ साली केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत येणार्या जाहिरात आणि दृक प्रचार संचालनालयातर्फे आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या जाहिरात रेखाटन स्पर्धेत त्यांना देशातून प्रथम पुरस्कार मिळाला होता. या स्पर्धेत देशभरातील एकूण १६ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. जागतिक जल दिनानिमित्ताने दिल्ली येथे आयोजित आं तरराष्ट्रीय व्यंगचित्र प्रदर्शनातही त्यांच्या व्यंगचित्रांचा समावेश करण्यात आला होता. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ काटरूनिस्ट या संस्थेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय अर्कचित्र प्रदर्शनात तीन वेळा त्यांची अर्कचित्रे प्रदर्शित झाली आहेत. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांच्यावर काढलेली व्यंगचित्र मालिका स्वत: सचिन यांच्याकडे संग्रही आहे.