दोन हजार युनिटची वीजचोरी करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:16 IST2021-05-30T04:16:43+5:302021-05-30T04:16:43+5:30
अकोला : बैदपुरा परिसरातील लाल बंगला छोटी मशीद येथील एका घरात सुमारे २ हजार ३९८ युनिटची वीजचोरी करणाऱ्या आरोपीस ...

दोन हजार युनिटची वीजचोरी करणारा गजाआड
अकोला : बैदपुरा परिसरातील लाल बंगला छोटी मशीद येथील एका घरात सुमारे २ हजार ३९८ युनिटची वीजचोरी करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लाल बंगला येथील रहिवासी परवेज अहमद खान हुसेन खान यांनी घरातील मीटरमध्ये वायर टाकून मीटर बंद करून सुमारे २ हजार ३९८ युनिट चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे १ जानेवारी, २०१९ रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर, आरोपी तेव्हापासून फरार झाला होता. या वीजचोरी प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी विशेष पथकाचे गठन केले असून, या पथकातील पोलिसांनी आरोपी परवेज अहेमद खान हुसेन खान याला अटक केली. त्यानंतर, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.