अल्पवयीन मुलीला अश्लील इशारे करणारा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:17 IST2021-05-22T04:17:48+5:302021-05-22T04:17:48+5:30

जुने शहर पोलिसांची कारवाई अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पोळा चौकात रहिवासी असलेल्या एका दहा ...

Gajaad who made obscene gestures to a minor girl | अल्पवयीन मुलीला अश्लील इशारे करणारा गजाआड

अल्पवयीन मुलीला अश्लील इशारे करणारा गजाआड

जुने शहर पोलिसांची कारवाई

अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पोळा चौकात रहिवासी असलेल्या एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील इशारे करणाऱ्या युवकास जुने शहर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

पोळा चौकातील रहिवासी एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरासमोर खेळत असताना संजय ऊर्फ माकोडा हरिदास मेसरे वय २७ वर्ष राहणार भोईपुरा पोळा चौक याने मुलीला अश्लील इशारे केले. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी युवकांस हटकले असता त्याने त्यांनाही शिवीगाळ करम्यचा प्रयत्न केला. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या आईने जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संजय हरिदास मेसरे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ तसेच पोस्को कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर जुने शहर पोलिसांनी तातडीने आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणाचा तपास जुने शहरचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Web Title: Gajaad who made obscene gestures to a minor girl