गद्रे ऑटोकॉनमधील व्यवस्थापकाचा युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

By Admin | Updated: July 31, 2014 02:08 IST2014-07-31T02:04:40+5:302014-07-31T02:08:52+5:30

अकोला शहरातील घटना: बैठकीचे निमित्त करून युवतीला बोलाविले हॉटेलमध्ये.

Gadre AutoConnell's man tried to overpriced the girl | गद्रे ऑटोकॉनमधील व्यवस्थापकाचा युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

गद्रे ऑटोकॉनमधील व्यवस्थापकाचा युवतीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अकोला: शिवणी येथील गद्रे ऑटोकॉन प्रा.लि. मधील व्यवस्थापकाने बैठकीचे निमित्त करून युवतीला हॉटेल ग्रीनलॅन्डमधील १0६ क्रमांकाच्या खोलीमध्ये बोलावून तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत, तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही बाब काही युवकांना माहीत पडल्याने, त्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला. युवकांनी व्यवस्थापकाची चांगलीच धुलाई करीत त्याला खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना बुधवारी सकाळी १0.३0 वाजताच्या सुमारास घडली.
गंगानगर क्र. २ मध्ये राहणारा मोहम्मद जावेद हाजी हारूण (३८) हा शिवणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील गद्रे ऑटोकॉन प्रा. लि. येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. या ठिकाणी केशवनगर भागात राहणारी एक २0 वर्षीय युवतीसुद्धा काम करते. आरोपी तिला नेहमी त्रास देत असे, तिची छेड काढीत असे. तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी धमकी देत असे. बुधवारी सकाळी त्याने युवतीला फोन करून कंपनीची हॉटेल ग्रीनलॅन्डमध्ये बैठक असल्याचे सांगून तिला हॉटेलमध्ये बोलावून घेतले. युवती हॉटेलमध्ये आल्यावर त्याने तिला खोली क्र. १0६ मध्ये बोलाविले आणि तिला नोकरीवरून काढण्याची, समाजात बदनामी करण्याची धमकी देत, तिचा हात पकडला. तिला पलंगावर बसवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला; परंतु ही बाब काही युवकांना समजल्यावर त्यांनी हॉटेलवर धाव घेतली आणि मोहम्मद जावेद याला पकडून त्याची यथेच्छ धुलाई केली. खदान पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास आरोपी मोहम्मद जावेद याच्यावर गुन्हा दाखल केला.

*अँन्टी गुंडा स्क्वॉडमुळे टळला अनर्थ
२५ ते ३0 युवकांच्या जमावाने आरोपी मोहम्मद जावेद याला पकडून त्याची धुलाई केली. घटनेची माहिती अँन्टी गुंडा स्क्वॉडचे महेंद्र बहादूरकर, विलास बंकावार, संतोष गवई यांना कळल्यावर त्यांनी हॉटेलवर धाव घेतली आणि जमावाच्या तावडीतून युवकाची सुटका करीत, त्याला खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. अँन्टी गुंडा स्क्वॉड तेथे पोहोचले नसते तर जमावाने आरोपीला यमसदनी धाडण्याचा निश्‍चय केला होता.

Web Title: Gadre AutoConnell's man tried to overpriced the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.