मृत्यूंच्या आकडेवारीचे गाैडबंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:18 IST2021-04-15T04:18:38+5:302021-04-15T04:18:38+5:30
शहरातील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती़ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने १४ जणांना मुखाग्नी दिला़ ...

मृत्यूंच्या आकडेवारीचे गाैडबंगाल
शहरातील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक नव्हती़ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने १४ जणांना मुखाग्नी दिला़ यामध्ये शहरातील दहा तसेच बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील चार मृतदेहांचा समावेश हाेता़ उर्वरित एका मृतदेहावर उद्या गुरुवारी अंत्यसंस्कार केला जाणार आहे़ यादरम्यान, ‘जीएमसी’ व जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेली मृतांची आकडेवारी अचंबित करणारी असून आकडेवारीत इतक्या माेठ्या प्रमाणात तफावत का, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़
काही प्रश्न अनुत्तरित?
मृतांचा आकडा पाहता व जिल्हा प्रशासनाने दिलेली माहिती लक्षात घेता ‘लाेकमत’ चमूने यातील मृतांच्या नातेवाईकांसाेबत संपर्क साधला़ त्यांनीदेखील मृतदेहांवर बुधवारी अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले़ ‘जीएमसी’ व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या मृतांच्या आकडेवारीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत़