शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

बाजारपेठेत फर्निशिंगची धामधूम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:43 IST

अकोला: दिवाळीत होणाºया साफसफाईसोबतच गृहसजावटीच्या वस्तूंची खरेदी आणि घरातील जुन्या सोफासेट, दिवानची फर्निशिंग जोरात आहे. त्यातही कर्टन आणि अपव्होल्स्ट्रीमध्ये इम्पोर्टेंड कापडांना अधिक मागणी असून, त्यामित्ताने अकोल्यातील हॅन्डलूम्सची बाजारपेठ सजली आहे.दिवाळीच्या निमित्ताने सुरू झालेल्या गृहसजावटीसाठी सोफासेटचे कुशन, आॅफिस, घरादारातील पडदे, बेडशीट-लीनेन, कारपेट, कार कुशन, गाद्या, चादर, पिलोज, पायपोसची खरेदी मोठ्या प्रमाणात ...

ठळक मुद्देकर्टन, अपव्होल्स्ट्रीमध्ये इंम्पोर्टेड कापडांना अधिक पसंती

अकोला: दिवाळीत होणाºया साफसफाईसोबतच गृहसजावटीच्या वस्तूंची खरेदी आणि घरातील जुन्या सोफासेट, दिवानची फर्निशिंग जोरात आहे. त्यातही कर्टन आणि अपव्होल्स्ट्रीमध्ये इम्पोर्टेंड कापडांना अधिक मागणी असून, त्यामित्ताने अकोल्यातील हॅन्डलूम्सची बाजारपेठ सजली आहे.दिवाळीच्या निमित्ताने सुरू झालेल्या गृहसजावटीसाठी सोफासेटचे कुशन, आॅफिस, घरादारातील पडदे, बेडशीट-लीनेन, कारपेट, कार कुशन, गाद्या, चादर, पिलोज, पायपोसची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. या खरेदीवर लक्ष ठेवून अकोल्यातील हॅन्डलूम्सची बाजारपेठ सज्ज झाली आहे. त्यामित्ताने अकोल्यातील ग्राहकांकडून इम्पोर्टेड साहित्यांना अधिक पसंती मिळत आहे. अहमदाबादहून मोठ्या प्रमाणात अकोल्यात साहित्य येत असून, यासाठी फोम हाऊस, छाया हॅन्डलुम्स, इंडिया, एटी कलेक्शन, न्यू इंडिया, विदर्भ, कृष्णा हॅन्डलुम्सचे नाव घेतले जाते.*कर्टनमध्ये रंगसंगतीच्या हजारो छटा..कर्टनमध्ये रंगसंगतीच्या हजारो छटा आल्या असून, ग्राहकांची पहिली पसंती इंम्पोर्टेड कापडांना मिळत आहे. कधीकाळी नेट, पॉलीस्टर, कॉटन, जेकॉट सिल्कचे पडदे वापरले जात असत; मात्र अलीकडे इंम्पोर्टेड पडदे बाजारात आल्याने ग्राहक त्याकडे वळले आहेत. दारांसाठी आणि खिडक्यांसाठी लागणारे पडदे अकोल्यात विक्रीसाठी उपलब्ध असून, शंभर रुपयांपासून तर पंधराशे रुपयांपर्यंत या पडद्यांची किंमत आहे.* मेमरी आणि एचआर फोमची चलती..कधी काळी सोफा आणि गाद्यांसांठी क्वायर-नारळाच्या दोºयाचा वापर व्हायचा; मात्र त्यानंतर रबर-डनलॉप फोम, वेस्ट फोमच्या तुकड्यांचे बॉन्डेड, बाजारात आले; मात्र अलीकडे मेमरी, एचआर आणि जेल फोमसारखे अद्यावत पर्याय उपलब्ध झाले आहेत. कधीकाळी एक हजार रुपयांत मिळणारी ३ बाय ६ ची गादी आता दहा हजारापर्यंत पोहोचली आहे.*अपव्होलस्ट्रीचे स्वरूप बदलत चालले...कधीकाळी सोफासेटसाठी रेग्झीन कापड आणि त्यातील प्लेन रंगांना मागणी असायची; मात्र अत्याधुनिकतेमुळे अपव्होलस्ट्रीचे स्वरूपही बदलले. रेग्झीन नंतर जूट, शनिल,लेदर, वेलवेटच्या कापडांनी ग्राहकांना आकर्षित केले. इंम्पोर्टेडमध्ये आता बाजारात स्वेड कापडाला अधिक मागणी आहे. रंगसंगतीच्या हजारो छटांना नवीन कापड ग्राहकांना आकर्षित करून घेत आहे.- नवीन सोफसेट आणि गाद्या घेण्याऐवजी अनेक जण दोन ते पाच वर्षानंतर त्यावर मेमर आणि एचआर फोमचे स्तर बदलून नवीन पद्धतीचे कापड लावून घेतात. त्यामुळे जुने फर्निचर पुन्हा नवीन रूपात येते. इंम्पोर्टेड कापडांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.- किरण कुडुपले (गोयनका), फोम हाऊस, अकोला.