मानवी अवयव प्रदर्शनातून गोळा झालेला निधी दिला ‘मिशन दिलासा’साठी
By Admin | Updated: August 18, 2016 02:08 IST2016-08-18T02:08:38+5:302016-08-18T02:08:38+5:30
विद्यार्थी परिषदेचे उपक्रम: पालकमंत्र्यांकडे निधी सुपूर्द

मानवी अवयव प्रदर्शनातून गोळा झालेला निधी दिला ‘मिशन दिलासा’साठी
अकोला, दि. १७: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेतर्फे फेब्रुवारी महिन्यात स्नेहसंमेलन घेण्यात आले होते. या स्नेहसंमेलनात मानवी अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ११ हजार रुपयांचा निधी गोळा झाला. हा निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या स्नेहसंमेलनात मानवी अवयव प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रदर्शनाला शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यांच्याकडून मिळालेल्या पाहणी शुल्कातून ११ हजार रुपये गोळा झाले. हा निधी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी राबविण्यात येणार्या ह्यमिशन दिलासाह्णला देण्याचा निर्णय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेने घेतला. त्यानुसार स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते हा निधी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत डवंगे, डॉ. दिनेश नैताम, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, विद्यार्थी परिषदेचे अक्षय लोखंडे, दर्पण कांकरिया, अंकित तायडे, प्रशांत वाईनदेशकर उपस्थित होते.