शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

२१ पीएचसीमध्ये मिळणार पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 1:54 PM

जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्ण वेळ डॉक्टरची नियुक्ती करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देही पदभरती थेट मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे.या पदभरती अंतर्गत बीएएमएस डॉक्टरांना संधी मिळणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रात ६२ पैकी २१ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

- प्रवीण खेतेअकोला: वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे; मात्र लवकरच थेट मुलाखतीद्वारे ही रिक्त पदे भरण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळणार आहे.सध्या पावसाळ््याचे दिवस असून, जिल्ह्यात साथरोगाचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. साथ रोगावर नियंत्रणासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे विशेष मोहीम राबविली जात आहे; परंतु जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ६२ पैकी २१ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाला ही विशेष मोहीम राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय, अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाºया गावांमध्येही ग्रामस्थांना आरोग्याची चिंता सतावत आहे; मात्र ही चिंता आता लवकरच दूर होणार असून, जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रावर पूर्ण वेळ डॉक्टरची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही पदभरती थेट मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, १५ जुलै रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात मुलाखती घेण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी सांगितले.या ‘पीएचसी’चा समावेशआपातापा, कुरणखेड, कापशी, आलेगाव, महान, पिंजर, वाडेगाव, पंजगव्हाण, हातरुण, पारस, कुरूम यासह जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.बीएएमएस डॉक्टरांना संधीया पदभरती अंतर्गत बीएएमएस डॉक्टरांना संधी मिळणार असून, त्यांना दुपटीने मानधन वाढीचाही लाभ मिळणार आहे. ‘समान काम समान वेतन’ या धोरणांतर्गत त्यांना वेतन मिळणार असल्याने रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा बळकट होण्यास मदत होईल.जिल्ह्यातील २१ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी बीएएमएस डॉक्टरांची भरती प्रक्रिया १५ जुलै रोजी राबविण्यात येणार आहे. या पदभरतीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळणार असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा आणखी बळकट होण्यास मदत होईल.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाdoctorडॉक्टर