पत्नीची हत्या करणाऱ्या फरार पतीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:18 IST2021-05-10T04:18:45+5:302021-05-10T04:18:45+5:30
अकोली जहागीर येथे २ फेब्रुवारी रोजी रात्री निर्मला अशोक सोनवणे (वय ५५) या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा ...

पत्नीची हत्या करणाऱ्या फरार पतीला अटक
अकोली जहागीर येथे २ फेब्रुवारी रोजी रात्री निर्मला अशोक सोनवणे (वय ५५) या महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा पती अशोक सोनवणे याने दोराने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी तपास केला असता, या महिलेचा पती हा बीड जिल्ह्यात वीटभट्टीवर काम करतो. तो अकोली जहागीरला घरी आला असता दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातूनच पतीने पत्नीची हत्या केली. घटनेपासून आरोपी अशोक सोनवणे फरार होता. दरम्यान, आरोपी वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे जाऊन ९ मे रोजी अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड व त्यांच्या पथकाने केली.