नागपूर हत्याकांडातील फरार आराेपी अकाेल्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:19 IST2020-12-06T04:19:54+5:302020-12-06T04:19:54+5:30

अकाेला : नागपूर शहरातील सक्करदारा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इसमाची हत्या केल्यानंतर पाेलिसांनी अटक करून कारागृहात असलेला आराेपी प्रकृती ...

Fugitive accused in Nagpur massacre arrested | नागपूर हत्याकांडातील फरार आराेपी अकाेल्यात जेरबंद

नागपूर हत्याकांडातील फरार आराेपी अकाेल्यात जेरबंद

अकाेला : नागपूर शहरातील सक्करदारा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इसमाची हत्या केल्यानंतर पाेलिसांनी अटक करून कारागृहात असलेला आराेपी प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयातून पाेलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला हाेता. त्याला अकाेट फैल व नागपूर पाेलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत गुडधी परिसरातून अटक केली. त्याला घेऊन नागपूर पाेलीस रवाना झाले आहेत.

सक्करदरा परिसरात एका इसमाची वाजिद अहेमद ऊर्फ बंबईया अब्बास अली यांची २०१४ मध्ये हत्या केली हाेती. त्यानंतर आराेपी फरार झाला हाेता. तब्बल ६ वर्षांनी म्हणजेच ऑक्टाेबर २०२० मध्ये या आराेपीला अटक करण्यात नागपूर पाेलिसांना यश आले. मात्र कारागृहात असताना या आराेपीची प्रकृती खालावल्याने त्याला नागपूर रुग्णालयात ठेवण्यात आले हाेते. या दरम्यान आराेपी पाेलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला हाेता. त्यामुळे अजनी पाेलीस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. हा आराेपी अकाेल्यात असल्याची माहिती अकाेट फैल पाेलिसांना मिळाली. यावरून अकाेट फैलचे ठाणेदार महेंद्र कदम यांनी गुन्हे शाेध पथकातील कर्मचाऱ्यांना कामाला लावले. आराेपी गुडधी परिसरात बांधकामावर काम करीत असल्याची माहिती मिळताच त्याला अकाेट फैल पाेलिसांनी अटक केली. त्यानंतर नागपूर पाेलीस आराेपीला घेऊन रवाना झाले आहेत. ही कारवाई सुनील टाेपकर, शेख अस्लम, श्रीकांत पवार, दिलीप इंगाेले व संजय पांडे यांनी केली. त्यांना नागपूर पाेलिसांनी सहकार्य केले.

..........................................

तीन पाेलीस कर्मचारी निलंबित

अजनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शासकीय रुग्णालयातून आराेपी फरार झाला हाेता. यावेळी कार्यरत असलेल्या तीन पाेलीस कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीमुळे आराेपी पळाल्याचे समाेर आल्यानंतर नागपूर पाेलीस अधीकाऱ्यांनी तीन पाेलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले हाेते; मात्र आता आराेपीला अटक केल्यामुळे या कर्मचाऱ्यांना कार्यरत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Fugitive accused in Nagpur massacre arrested