विंधन विहिरी, कूपनलिकांना संजीवनी!

By Admin | Updated: August 17, 2014 01:50 IST2014-08-17T01:46:56+5:302014-08-17T01:50:34+5:30

अमरावती विभागात १५३ कामे प्रस्तावित

Fuel wells, sunflowers for couples! | विंधन विहिरी, कूपनलिकांना संजीवनी!

विंधन विहिरी, कूपनलिकांना संजीवनी!

संतोष येलकर /अकोला
बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या विंधन विहीरी आणि कुपनलिकांकडे पाण्याचे झरे वळवून, भूजल पातळी वाढविण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये १५३ जलभंजनाची (हायड्रो फॅक्चरिंग) कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत. जलभंजन यंत्राव्दारे ही कामं सुरूही झाली आहेत.
पाऊस कमी होत असल्याने दिवसेंदिवस भूजल पातळीत घट होत आहे. भूजल पातळी खोल जात असल्याने, विंधन विहिरी (बोअर) आणि कुपनलिका (ट्युबवेल) बंद पडत आहेत. बंद पडणार्‍या बोअरच्या दिशेने परिसरातील पाण्याचे झरे वळवून, या बोअर्स जिवंत करण्यासाठी जलभंजन केले जाते. जलभंजन (हायड्रो फॅक्चरिंग) यंत्राव्दारे हवा व पाण्याच्या दाबाने बोअरचे पुनरुज्जीवन करुन पाण्याची उत्पादकता वाढविली जाते. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेमार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये १५३ बोअर्सच्या जलभंजनाची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. सर्वेक्षण पूर्ण झालेल्या काही ठिकाणी जलभंजनाच्या कामांना सुरुवातही करण्यात आली आहे. १४ ऑगस्टपर्यंंत अकोला जिल्ह्यात ३ बोअर्सच्या जलभंजनाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने, बंद पडणार्‍या बोअर्सचे जलभंजनाच्या कामातून पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

जलभंजनाची विभागातील प्रस्तावित कामे!
जिल्हा               कामे
अमरावती             ४0
अकोला                 ४८
वाशिम                  २५
बुलडाणा                ३0
यवतमाळ              १0
एकूण                  १५३

Web Title: Fuel wells, sunflowers for couples!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.