स्थायी समितीची शुक्रवारी सभा
By Admin | Updated: March 16, 2016 08:38 IST2016-03-16T08:38:14+5:302016-03-16T08:38:14+5:30
अकोला मनपाच्या अंदाजपत्रकावर होणार निर्णय.

स्थायी समितीची शुक्रवारी सभा
अकोला: महापालिकेच्या सुधारित आणि मूळ अंदाजपत्रकावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मनपाच्या स्थायी समिती सभागृहात १८ मार्च रोजी (शुक्रवार) सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन वर्षानंतर अस्तित्वात आलेल्या स्थायी समितीची ही पहिलीच सभा असल्याने सभेच्या कामकाजाकडे लक्ष लागले आहे.
प्रशासकीय यंत्रणेत नियोजनाचा अभाव असून, उत्पन्न वाढीसाठी ठोस प्रयत्न होत नसल्याने महापालिकेत वेतनासह अनेक समस्या निर्माण होतात. प्रशासनाकडून दरवर्षी सादर केला जाणार्या अर्थसंकल्पात विविध विभागांमार्फत नाहक आकडे फुगवून सादर केले जातात. प्रत्यक्षात निधीची तरतूद करताना आणि खर्च करताना प्रशासकीय यंत्रणेची धांदल उडते. यामुळे नगरसेवकांसह कर्मचार्यांचीसुद्धा डोकेदुखी वाढते. मनपा आयुक्त अजय लहाने यांच्याकडून ह्यरिअँलिस्टिकह्ण बजेट सादर करण्याची अपेक्षा आहे. स्थायी समितीचे गठन होताच सभापती विजय अग्रवाल यांनी सन २0१५-१६ चे सुधारित आणि २0१६-१७ च्या मूळ अंदाजपत्रकावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी १८ मार्च रोजी स्थायी समितीचे आयोजन केले आहे.