बोंडअळीग्रस्तांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीची वेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 18:22 IST2018-09-16T18:22:06+5:302018-09-16T18:22:09+5:30

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे.

Frequent demand for fund to help Bollworm victims! | बोंडअळीग्रस्तांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीची वेळ !

बोंडअळीग्रस्तांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीची वेळ !

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १० सप्टेंबर रोजी पुन्हा निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.
गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांसाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त १ लाख ४५ हजार कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना तीन हप्त्यात मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार मदत वाटपाचा पहिला व दुसरा हप्ता मिळून जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ९० कोटी ३४ लाख रुपयांचा मदत निधी शासनामार्फत प्राप्त झाला होता. उपलब्ध मदत निधी बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित तिसºया व अंतिम हप्त्यातील मदत जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना वाटप करण्यासाठी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने मदत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला; मदत निधी प्राप्त झाला नसल्याने, पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १० सप्टेंबर रोजी बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.परंतू, जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी अद्यापही ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आल्याचे चित्र आहे.

निधी केव्हा प्राप्त होणार?

बोंडअळीग्रस्त शेतकºयांना वाटप करावयाच्या तिसºया व अंतीम हप्त्याचा निधी अद्याप शासनामार्फत प्राप्त झाला नसल्याने, मदत निधी केव्हा प्राप्त होणार, याबाबत मदतीच्या लाभापासून वंचीत असलेल्या जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे.

 

Web Title: Frequent demand for fund to help Bollworm victims!