अपूर्ण सिंचन विहिरींच्या कामांचा मार्ग मोकळा!
By Admin | Updated: December 23, 2014 00:46 IST2014-12-23T00:46:35+5:302014-12-23T00:46:35+5:30
कामे पूर्ण करण्यासाठी ८.५0 कोटी.
_ns.jpg)
अपूर्ण सिंचन विहिरींच्या कामांचा मार्ग मोकळा!
संतोष येलकर / अकोला: धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्यात सिंचन विहिरींची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून ८ कोटी ५0 लाख ९८ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ डिसेंबर रोजी हा निधी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाला वितरित केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये सन २00९ पासून धडक सिंचन विहीर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यातील १ हजार ५0४ सिंचन विहिरींची कामे गत तीन-चार वर्षांपासून अपूर्ण आहेत. धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी, या विहिरींच्या कामांकरिता लाभार्थी शेतकर्यांना दिल्या जाणार्या अनुदानात दीड लाखावरून अडीच लाखापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय गतवर्षी फेब्रुवारीमध्ये शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार जिल्हय़ातील १ हजार ५0४ सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ८ कोटी ५0 लाख ९८ हजारांचा निधी शासनामार्फत गत २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागाला प्राप्त झाला. प्राप्त झालेला हा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाला वितरित करण्यात आला. लघुसिंचन विभागामार्फत हा निधी लवकरच पंचायत समिती स्तरावर वितरित करण्यात येणार असून, पंचायत समित्यांकडून लाभार्थी शेतकर्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.