जिल्हा क्षयरोग मुक्त करा - जिल्हाधिकारी पापळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST2021-03-25T04:19:03+5:302021-03-25T04:19:03+5:30

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग कार्यालय व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक पथकाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील ...

Free District Tuberculosis - Collector Papalkar | जिल्हा क्षयरोग मुक्त करा - जिल्हाधिकारी पापळकर

जिल्हा क्षयरोग मुक्त करा - जिल्हाधिकारी पापळकर

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हा क्षयरोग कार्यालय व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक पथकाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अधिक्षीक डॉ. आरती कुलवाल, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. विरेन्द्र वानखडे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे, आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक आदी उपस्थित होते. जिल्ह्यात क्षयरोग कार्यक्रम चांगल्याप्रकारे राबविल्यामुळे क्षयरोग कार्यक्रमाचे उद्दिष्ट गाठण्यात राज्यातून अकोला जिल्ह्यास दुसरा क्रमांक मिळाला. उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील काळात देखील आणखी चांगल्या प्रकारे काम करून २०२४ पर्यंत जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याकरिता जोमाने काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. गोळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत उन्हाळे तर आभार जनईकर यांनी मानले.

Web Title: Free District Tuberculosis - Collector Papalkar