बँक मॅनेजर असल्याचे सांगून फसवणूक
By Admin | Updated: February 16, 2015 02:10 IST2015-02-16T02:10:42+5:302015-02-16T02:10:42+5:30
अकोट येथील प्रकार; गुन्हा दाखल.

बँक मॅनेजर असल्याचे सांगून फसवणूक
आकोट: बँक ऑफ इंडिया शाखा आकोटचा मॅनेजर असल्याचे सांगून मोबाइलवरून एटीएम कार्ड व कोडची माहिती घेत फिर्यादीच्या खात्यातून ४४ हजार ५७0 रुपये लंपास केल्याची घटना १५ ते १६ जुलै २0१४ रोजी घडली होती. या प्रकरणी आकोट शहर पोलिसात दाखल फिर्यादीवरून आकोट पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी संबंधित मोबाइलधारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
एम. जी. हार्डवेअर तर्फे मो. गालीब रहेमान यांच्या तक्रारीनुसार, १५ ते १६ जुलै २0१४ दरम्यान मोबाईल क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीने फिर्यादी व त्याच्या मुलाच्या मोबाइलवर फोन करून त्यांचा एटीएम कार्डचा नंबर व कोड खरा आहे का, असे विचारले. फिर्यादीने तो खरा असल्याचे सांगितल्यानंतर मोबाइलधारकाने, मी बँक ऑफ इंडिया शाखा आकोटचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून एटीएमची तपासणी सुरू आहे. त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक व पासवर्ड सांगा असे म्हटले. तो दिल्यानंतर तुम्ही २४ तास एटीएम कार्डचा वापर करू नका, असे सांगितले. त्यामुळे दुसर्या दिवशी फिर्यादीने खात्याची तपासणी केली असता ४४ हजार ५७0 रुपये परस्पर खात्यातून काढून घेण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादीवरून, पोलिसांनी मोबाइलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.