विमा कंपनीकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फसवणूक
By राजेश शेगोकार | Updated: April 16, 2023 16:37 IST2023-04-16T16:37:31+5:302023-04-16T16:37:42+5:30
हेल्थ इन्शुरन्स कंपनीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास विम्याचा लाभ व नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत फसवूणक केली आहे.

विमा कंपनीकडून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची फसवणूक
अकोला : चोलामंडलम नामक विमा कंपनीला सर्व कागदपत्रे दिल्यानंतरही सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला विम्याचा लाभ दिला नाही. त्यामुळे कंपनीविरुद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली.
आयोगाने कर्मचाऱ्याच्या बाजूने निर्णय दिला. ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या आदेशानंतरही चोलामंडलम हेल्थ इन्शुरन्स कंपनीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास विम्याचा लाभ व नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करत फसवूणक केली आहे. केशवनगरातील सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश प्रभाकर नाटकर (७२) यांनी २०१६ चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीची दोन लाख रुपयांची पॉलिसी काढली होती.
कोरोना काळात आजारी पडल्यानंतर झालेल्या उपचारांची, औषधांची खर्चाची त्यांनी सर्व कागदपत्रे कंपनीला पाठविली, परंतु कंपनीने त्यांना कागदपत्रे मिळाली नसल्याचे कारण सांगत, पुन्हा कागदपत्रे पाठविण्यास सांगितले. त्यानंतरही कंपनीने ४७ हजार रुपयांचे बिल देण्यास टाळाटाळ केली आहे.