मूतीर्ची तोडफोड
By Admin | Updated: August 12, 2015 23:18 IST2015-08-12T23:18:15+5:302015-08-12T23:18:15+5:30
वाशिम जिल्ह्यातील घटना; गुन्हा दाखल

मूतीर्ची तोडफोड
कारंजा लाड (जि. वाशिम): तालुक्यातील जयपूर येथील पुरातन हनुमान मंदिरातील मूर्तीची अज्ञात माथेफिरूने तोडफोड करून विटंबना केली. ही घटना १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिसांनी एका जणाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारंजा शहराजवळील जयपूर (शहा) येथील हनुमान मंदिराच्या गाभार्यातील हनुमान मूर्तीची तोडफोड करण्यात आली. मंदीरातील नंदी उलटा करण्यात आला. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास गावातील एका व्यक्तीस हा प्रकार निदर्शनास आला. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी वाशिम येथील श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान पोलीसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.