चौथीच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाला नवे रूप!

By Admin | Updated: December 28, 2014 23:59 IST2014-12-28T23:59:18+5:302014-12-28T23:59:18+5:30

२0१५ पासून अंमलबजावणी : शिष्यवृत्ती परीक्षा नवीन अभ्यासक्रमानुसार.

Fourth scholarship course new! | चौथीच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाला नवे रूप!

चौथीच्या शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाला नवे रूप!

ब्रह्मनंद जाधव/मेहकर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता चौथीची शिष्यवृत्ती परीक्षा आता नवीन अभ्यासक्रमानुसार होणार आहे.
इयत्ता चौथीचा नवा अभ्यासक्रम सन २0१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून अमलात आला आहे. या अभ्यासक्रमावर आधारित इयत्ता चौथीची पूर्व मध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व विमुक्त जाती-जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहेत. नव्या अभ्यासक्रमात परिसर अभ्यास एकमध्ये सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे. तर परिसर अभ्यास दोनमध्ये एकत्रित अभ्यासक्रम असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेच्या पेपर क्रमांक दोनमध्ये गणितासह परिसर अभ्यास एक अंतभरूत करण्यात आला आहे. तसेच पेपर क्रमांक दोनमध्ये बुद्धिमत्ता चाचणीसह परिसर अभ्यास दोन अंतभरूत करण्यात आला आहे. मराठी माध्यमासह उर्दू, हिंदी, गुजराती, तेलुगु, सिंधी व कन्नड या सात माध्यमांचे पेपर क्रमांक एकचे विषयनिहाय गुणनियोजन समान असणार आहे. इंग्रजी माध्यमाचे गुणनियोजन स्वतंत्रपणे देण्यात आले आहे. मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तेलुगु, सिंधी व कन्नड या आठही माध्यमांचे पेपर क्रमांक दोन व तीनचे विषयनिहाय गुणनियोजन समान राहणार आहे. मराठी व इंग्रजी माध्यमाचे पेपर क्रमांक एक, दोन व तीनचे क्षेत्रनिहाय बदल नमुना प्रश्नपत्रिका व उत्तरसूची यांचे अंतिम आराखडे स्वतंत्रपणे परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.

*गुण विभागणीचा अंतिम आराखडा तयार
राज्य शैक्षणिक संधोधन व प्रशिक्षण परिषदेच्या अभ्यासक्रमावर आधारित विषययोजना, घटकनिहाय गुण विभागणीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे. मराठी माध्यमाप्रमाणेच उर्दू, हिंदी, गुजराती, तेलुगु, सिंधी व कन्नड या माध्यमांचेही क्षेत्रनिहाय व घटकनिहाय गुणविभागणी, प्रश्नपत्रिकेचा नमुना व उत्तरसूची राहणार आहे.

Web Title: Fourth scholarship course new!