प्रशासनाकडून उपाेषण बेदखल; शेटे महाराजांची प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 11:23 AM2020-12-06T11:23:37+5:302020-12-06T11:24:53+5:30

Akola News चार दिवसांपासून विश्व वारकरी सेेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी आमरण उपाेषण सुरू केले आहे

On the fourth day of the fast, Shete Maharaj's health deteriorated | प्रशासनाकडून उपाेषण बेदखल; शेटे महाराजांची प्रकृती खालावली

प्रशासनाकडून उपाेषण बेदखल; शेटे महाराजांची प्रकृती खालावली

Next
ठळक मुद्देत्यांनी रुग्णालयात दाखल हाेण्यास नकार दिला आहे.वारकरी व हभप मंडळी साखळी उपाेषणाला बसले आहेत.

अकाेला: शंभर भक्तांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना भजन-कीर्तनाची सेवा करू द्यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून विश्व वारकरी सेेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी आमरण उपाेषण सुरू केले आहे, तर या उपाेषणाला पाठिंबा म्हणून इतर वारकरी व हभप मंडळी साखळी उपाेषणाला बसले आहेत; मात्र चवथ्या दिवशीही प्रशासनाकडून हे उपाेषण बेदखल करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी गणेश महाराज शेटे यांची प्रकृती खालावली असून, त्यांनी रुग्णालयात दाखल हाेण्यास नकार दिला आहे.

या उपाेषण मंडपात दरराेज कीर्तन सेवा दिली जात आहे. संध्याकाळी हरिपाठ हाेताे. आमरण उपोषणाला भेट देण्याकरिता महाराष्ट्रातील संतमंडळी येत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंढरपूरचे स्वरूप आले आहे. शनिवारी महादेव महाराज निमकंडे, विठ्ठल महाराज साबळे, राजू महाराज कोकाटे, मोहन महाराज गोंडचोर, गजानन महाराज ऐरोकार, प्रवीण महाराज कुलट, निखिल महाराज गोबरे, गोपाल महाराज नारे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, ज्ञानेश्वर महाराज सोळंके, श्रीकृष्ण महाराज बाबुळकर, विजय महाराज राऊत, पुरुषोत्तम महाराज मोरे, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज उकर्डे, गजानन मोडक, सचिन पाकने, ज्ञानू वसतकार, मोहन भाऊ खापरे, साहेबराव काळे, विनोद महाराज पवार, श्रीधर महाराज ताळोकार, प्रसाद महाराज कुलट, शिवशंकर महाराज इंगळे, गजानन माउली हागे, किशोर महाराज वानखडे, डॉ. कल्याणी पदमने, वर्षा गावंडे, शीला दीक्षीत, वनमाला शिवनाद यांनी भेट दिली.

उपमुख्यमंत्र्यांसाेबत दूरध्वनीवर चर्चा 

आमदार अमोल मिटकरी व राष्ट्रवादी अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी भेट दिली असता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अमोलदादा मिटकरी यांची मोबाइलद्वारे चर्चा झाली तसेच जयंत पाटील व शेटे महाराज यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली; पण सध्या लेखी स्वरूपात परवानगी देऊ शकत नाही. आठ दिवसांनंतर मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करून सांगतो, हे आश्वासन देण्यात आले; पण लेखी स्वरूपात आश्वासन असल्याशिवाय आमरण उपोषण मागे घेणार नाही, अशी शेटे महाराजांनी माहिती दिलेली आहे.

Web Title: On the fourth day of the fast, Shete Maharaj's health deteriorated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.