हत्या प्रकरणातील चौथा आरोपी गजाआड

By Admin | Updated: October 28, 2016 03:05 IST2016-10-28T03:05:14+5:302016-10-28T03:05:14+5:30

गांधी रोडवरील चौपाटीवर हत्या प्रकरण.

The fourth accused in the murder case GajaAud | हत्या प्रकरणातील चौथा आरोपी गजाआड

हत्या प्रकरणातील चौथा आरोपी गजाआड

अकोला, दि. २७- गांधी रोडवरील चौपाटीवर जमील अली नजरत अली (२४ रा. पाचमोरी, अकोट फैल) याची २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील चौथा आरोपी दीपक ससाणे याला गुरुवारी दुपारी कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
जमील अली नजरत अली (२४) हा गुलाम हुसेन औलाद हुसेन (रा. इराणी झोपडपट्टी) याच्यासोबत गांधी रोडवरील चौपाटीवर आला होता. चौपाटीवरील सरिता नामक हॉटेलमध्ये दोघांनी चर्चा सुरू केली. या दोघांनी १३ चोर्‍या सोबत केल्या असून, या चोर्‍यांमधील मुद्देमालाची हिस्सेवाटणी आणि जामिनासाठी लागलेला खर्च यावर दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर गुलाम हुसेन औलाद हुसेन, जाफर अली हुमायू अली, सागर ऊर्फ शकील हरिभाऊ सोनोने आणि दीपक ससाणे या चौघांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती; परंतु आरोपी ससाणे हा फरार होता. त्याला गुरुवारी दुपारी कोतवाली पोलिसांनी अटक केली.

Web Title: The fourth accused in the murder case GajaAud