निवडणुकीसाठी ४ हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2017 02:30 IST2017-02-18T02:30:44+5:302017-02-18T02:30:44+5:30

५८७ मतदान केंद्रांवर होणार मतदान; आयुक्तांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

Four thousand officers-employees are ready for the elections | निवडणुकीसाठी ४ हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज

निवडणुकीसाठी ४ हजार अधिकारी-कर्मचारी सज्ज

अकोला, दि. १७-महापालिका निवडणुकीच्या मतदान व मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून ४ हजार अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी रोजी ५८७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार असून २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक यंदा विविध बाबींनी ऐतिहासिक ठरणार आहे. महापालिका क्षेत्राची हद्दवाढ होऊन नवीन २४ गावांचा मनपात समावेश झाला. त्यामुळे प्रभागांचे क्षेत्रफळ व नगरसेवकांच्या संख्येतदेखील वाढ झाली. निवडणूक प्रक्रिया पारदश्री व शांतपणे पार पडावी, यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सहायक अधिकार्‍यांसह इतर कर्मचारी अशा एकूण ४ हजार अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्ती केल्याची माहिती मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दिली. २१ फेब्रुवारी रोजी ५८७ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया होणार असल्याने २0 फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंंत सर्व अधिकारी-कर्मचारी मतदान केंद्रावर नियुक्त होतील. २३ फेब्रुवारी रोजी खदान परिसरातील शासकीय गोदाम येथे मतमोजणी होणार असून मतदानाच्या दिवशीच (२१ फेब्रुवारी) सर्व इव्हीएम शासकीय गोदामावर पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर १00 मीटर अंतरावर राजकीय पक्षांच्या बुथ प्रमुखांना बुथ उघडता येतील. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदारांना माहिती देण्यासाठी उभारलेल्या मंडपात केवळ दोन व्यक्तींना (कार्यकर्ते) बसण्याची मुभा राहील. त्यापेक्षा जास्त कार्यकर्ते आढळल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे यावेळी आयुक्त लहाने यांनी स्पष्ट केले. मतदानाच्या दिवशी पारदश्री प्रक्रियेसाठी ४0 क्षेत्रीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली असून त्यांच्या दिमतीला ४0 कॅमेरामन नियुक्त करण्यात आले आहेत. शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी अकोलेकरांनी मोठय़ा संख्येने मतदान करण्याचे आवाहन यावेळी आयुक्त अजय लहाने यांनी केले. पत्रकार परिषदेला मनपा उपायुक्त तथा नोडल अधिक ारी समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले, सहायक आयुक्त जीतकुमार शेजव, प्रज्ञा खंदारे आदी उपस्थित होते.

Web Title: Four thousand officers-employees are ready for the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.