दरोड्याच्या प्रयत्नातील चौघे गजाआड

By Admin | Updated: April 26, 2017 02:03 IST2017-04-26T02:03:51+5:302017-04-26T02:03:51+5:30

खून आणि मकोकातील आरोपी होते दरोड्याच्या तयारीत

Four rounds of dacoits' attempt | दरोड्याच्या प्रयत्नातील चौघे गजाआड

दरोड्याच्या प्रयत्नातील चौघे गजाआड

अकोला : निमवाडी बसस्थानकाजवळ दरोड्याच्यी तयारी करीत असलेल्या चार कुख्यात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी सायंकाळी अटक केली. यामधील दोन आरोपी हे खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींकडून धारदार शस्त्र आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
निमवाडी बसस्थानकामागे चार जणांच्या संशयित हालचाली सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी निमवाडी परिसरात छापा टाकून वाशिम बायपास परिसरातील भगीरथवाडी येथील रहिवासी ओमप्रकाश भरत भटकर (३२), गाडगे नगरातील रहिवासी बंटी भगवान लंकेश्वर (३१), वाशिम जिल्ह्यातील जामखेड येथील रहिवासी साहेबराव आश्रुजी कालापाड (३२) आणि यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी नीलेश बिहारीप्रसाद ठाकूर (२९) यांना अटक केली. यामधील ओमप्रकाश भटकरकडून लोखंडी खंजर, नीलेश ठाकूरकडून दोरी, बंटी लंकेश्वरच्या खिशातील मिरची पावडरच्या पुड्या आणि कालापाड या आरोपीकडून वेगवेगळ्या चाव्यांचा गुच्छा व एक हजार ५०० रुपये पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी या चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकिरण नावकार, संदीप काटकर, प्रमोद डोईफोडे, राजेश वानखडे, संतोष गावंडे, मंगेश मदनकार व संदीप टाले यांनी केली.

Web Title: Four rounds of dacoits' attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.