अट्टल चोरट्यांकडून चार दुचाक्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2017 09:31 IST2017-07-09T09:31:35+5:302017-07-09T09:31:35+5:30

पारस, शेगाव येथील दोघांना अटक.

Four robbers seized by unidentified thieves | अट्टल चोरट्यांकडून चार दुचाक्या जप्त

अट्टल चोरट्यांकडून चार दुचाक्या जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या चार दुचाक्या सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी दोघांकडून जप्त केल्या. या दोघांनीही चोरीची कबुली दिली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १0 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाळापुर तालुक्यातील पारस येथील रहिवासी राजू उर्फ राजेंद्र श्रीकृष्ण हिवराळे (३६) व ज्ञानेश्‍वर वामनराव लिप्ते रा. शेगाव असे आरोपींची नाव आहेत. राजू हिवराळे हा सिटी कोतवाली पोलिसांना लक्झरी स्टॅण्डजवळ संशयितरीत्या दुचाकीवर दिसून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला दुचाकीचे दस्तावेज मागितले असता गाडीच्या मालकीचे कागदपत्रेही तो दाखवू शकला नाही. त्याच्यावर संशय आल्याने त्याला पोलीस ठाण्यात नेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने ज्ञानेश्‍वर लिप्तेचे नाव सांगितले. या दोघांनी मिळून गांधी रोडवरून एम.एच. ३0 क्यू ९९४२ व एम.एच. ३0 ए ई ७३0३ चोरल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी हातरून येथील ज्ञानेश्‍वर लिप्तेला अटक केली.

Web Title: Four robbers seized by unidentified thieves