Four more die in Akola district, 479 new positive | अकोला जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू, ४७९ नवे पॉझिटिव्ह

अकोला जिल्ह्यात आणखी चौघांचा मृत्यू, ४७९ नवे पॉझिटिव्ह

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून गुरुवार, ४ मार्च रोजी आणखी चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ३७८ एवढी झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४२४, तर रॅपिड अँटीजेन चाचण्यांमध्ये ५५ अशा एकूण ४७९ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १७,९२५ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,८१९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,३९५ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील ४०,पारस येथील १४, डाबकी रोड येथील १६, कौलखेड, बार्शी टाकळी व खडकी येथील प्रत्येकी ११, मोठी उमरी येथील १०, पातूर येथील नऊ, जीएमसी व उरळ खु. येथील प्रत्येकी आठ, जठार पेठ व खोलेश्वर येथील प्रत्येकी सहा, राम नगर, रामदास पेठ, व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, खेडकर नगर, रजपूतपुर, आदर्श कॉलनी, रतनलाल प्लॉट, म्हैसांग, तापडीया नगर, मलकापूर, अकोट, सिंधी कॅम्प, बाळापूर व जुने आरटीओ येथील प्रत्येकी तीन, गर्ल्स हॉस्टेल, कळबेंश्वर, मनकर्णा, गजाननपेठ, अखातवाडा, खिनखिनी, कोठारी नगर, न्यू खेतान नगर, तेल्हारा, पोपटखेड, पातूर, म्हातोडी, वडगाव मेंडे, नायगाव, समता नगर, येदलापूर व जामठी बु. येथील प्रत्येकी दोन, एळवण, अकोट फैल,गजानन पेठ, शिवर, विठ्ठल नगर, दगडपूल, जीएमसी हॉस्टेल, सागर कॉलनी, समता नगर, कॉंग्रेस नगर, तारफैल, माधव नगर, आदर्श कॉलनी, न्यू तापडीया नगर, खदान, जुने शहर, श्रध्दा नगर, दुर्गा चौक, देहगाव, आपातापा, कापसी, दहिखेड ता.अकोट, गायत्री नगर, नखेगाव ता.अकोट, भागवतवाडी, गोकुल कॉलनी, सहकार नगर, इसीएचएस हॉस्पिटल, रणपिसे नगर, गड्डम प्लॉट, रणपिसे नगर, दहिहांडा, अंदुरा, मांजरी, वाशिम बायपास, महाजनी प्लॉट, शिवनी, गोडबोले प्लॉट, हनुमान वस्ती, तुकाराम चौक, केशवनगर, रागिनी वर्कशॉप, टॉवर चौक, शिवाजी नगर, अयोध्या नगर,वानखडे नगर, सिसा बोंदरखेड, लहान उमरी, हमता प्लॉट, राजुरा घाटे, विद्या नगर, निता गेस्ट हाऊस व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी मुर्तिजापूर येथील २१, अकोट येथील १६, बार्शीटाकळी येथील १५, डाबकी रोड येथील १०, उकडी बाजार येथील आठ, गोरक्षण रोड व पातूर येथील प्रत्येकी सात, कुरुम येथील पाच, कौलखेड व जीएमसी येथील प्रत्येकी चार, रामनगर, बुरड व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी तीन, सस्ती, तुकाराम चौक, खोलेश्वर, न्यु तापडीया नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, न्यु महसूल कॉलनी, कारला, व्हीएचबी कॉलनी, शिवसेना वसाहत, रजपूतपुरा, न्यु राधाकिशन प्लॉट, धोतर्डी, अकोट फैल, खदान, जाफराबाद, गोरवा, गणेश नगर, जूने शहर, शास्त्री नगर, गीता नगर, अनभोरा, गंगा नगर, छोटा पुल, पंचशिल नगर, माधव नगर, माळेगाव बाजार, बालाजी नगर, सांगवी बाजार, राम नगर, सोनाळा व सिव्हील लाईन येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

 

अकोला शहरातील तीन, चानी येथील एकाचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या अंबिका नगर, खदान येथील ७६ वर्षीय पुरुष व तापडीया नगर, येथील ७२ वर्षीय महिला, गोरक्षण रोड येथील ६८ वर्षीय पुरुष व पातूर तालुक्यातील चान्नी येथील ६५ वर्षीय पुरुष अशा चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद गुरुवारी झाली.

२५६ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २७, पास्टूल कोविड केअर सेंटर अकोट येथील २२, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील १०, सहारा हॉस्पीटल येथून पाच, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील आठ, ओझोन हॉस्पीटल येथील तीन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील दोन, नवजीवन हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथून ११, आयुर्वेदिक रुग्णालय येथून चार, अवघाते हॉस्पीटल येथून पाच तर होम आयसोलेशन येथील १४४ अशा एकूण २५६ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.

 

४,१२९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७,९२५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १३,४१८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३७८ जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ४,१२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Four more die in Akola district, 479 new positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.