‘फोर-जी’च्या खोदकामाला हिरवी झेंडी!
By Admin | Updated: August 18, 2016 02:05 IST2016-08-18T02:05:22+5:302016-08-18T02:05:22+5:30
अकोला मनपा पदाधिका-यांसह प्रशासनाची भूमिका संशयाच्या घे-यात सापडले.

‘फोर-जी’च्या खोदकामाला हिरवी झेंडी!
अकोला, दि. १७ : 'फोर-जी'च्या खोदकामाला मनपा प्रशासनाने दिलेल्या परवानगीवर आक्षेप नोंदवत बांधकाम विभागाचे क ार्यकारी अभियंता अजय गुजर यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला होता. मागील दोन दिवसांपासून संबंधित मोबाइल कंपनीने ह्यफोर-जीह्णच्या खोदकामाला सुरुवात केल्यामुळे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी व प्रशासनाची भूमिका संशयाच्या घेर्यात सापडली आहे.
शहरात ह्यफोर-जीह्णसेवा देण्यासाठी एअरटेल कंपनीला पालिका प्रशासनाने खोदकामाची परवानगी दिली. ह्यएचडीडीह्णमशीनद्वारे भूमिगत पद्धतीने खोदकाम करणे अपेक्षित असताना कंपनीने मजुरांच्या मदतीने खोदकाम सुरू केले होते. ऐन पावसाळ्य़ात रस्ते खोदून त्याची माती रस्त्यावर टाकली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून सर्वप्रथम भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी प्रशासनाकडे कंपनीसोबत केलेल्या कराराच्या दस्तावेजाची मागणी केली होती. त्यानंतर सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, सुनीता अग्रवाल व त्यापाठोपाठ महापौर उज्ज्वला देशमुख यांनी कंपनीच्या खोदकामावर आक्षेप घेत खोदकाम बंद करण्याचे पत्र दिले होते. प्रशासनाने कंपनीला ह्यएचडीडीह्णमशीनद्वारे खोदकाम करण्याची नोटीस दिली व नंतर खोदकाम बंद करण्याचे पत्र दिले. प्रशासनाच्या पत्राला केराची टोपली दाखवत कंपनीने खोदकाम सुरूच ठेवले.
हा विषय स्थायी समितीच्या सभेत पटलावर आला असता, सभापती विजय अग्रवाल यांनी प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला होता. त्यावेळी सर्वानुमते ह्यफोर-जीह्णचे खोदकाम बंद करून कार्यकारी अभियंता अजय गुजर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. स्थायी समितीच्या ठरावावर आयुक्त अजय लहाने यांनी कोणताही निर्णय न घेता तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर अचानक संबंधित कंपनीला ह्यएचडीडीह्णमशीनद्वारे खोदकामास परवानगी दिल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणातील नाट्यमय घडामोडी पाहता सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी, स्थायी समिती सदस्य व प्रशासनाची भूमिका संशयाच्या घेर्यात सापडली आहे.