‘फोर-जी’चे खोदकाम बंद करण्याचा आदेश!
By Admin | Updated: July 9, 2016 01:02 IST2016-07-09T01:02:56+5:302016-07-09T01:02:56+5:30
महापालिकेचा निर्णय : महापौरांनी दिले निर्देश

‘फोर-जी’चे खोदकाम बंद करण्याचा आदेश!
अकोला: ऐन पावसाळ्य़ात शहराच्या विविध भागात एअरटेल कंपनीने सुरू केलेल्या खोदकामाला खुद्द महापालिका प्रशासनानेच ह्यब्रेकह्णलावला. महापौर उज्ज्वला देशमुख यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मोबाइल कंपनीला काम बंद करण्याचा आदेश शुक्रवारी प्रशासनाने जारी केला.
अकोलेकरांना ह्यफोर-जीह्णसुविधा उपलब्ध क.रून देण्यासाठी एअरटेल कंपनीच्यावतीने शहरात खोदकाम केले जात आहे. मनपासोबत केलेल्या करारनाम्यानुसार कंपनीने रस्त्यांची तोडफोड न करता ह्यएडीडीह्ण मशीनद्वारे खोदकाम करणे अपेक्षित होते. काही भागात मजुरांच्या मदतीने खोदकाम करण्याचाही करारात समावेश आहे. मनपाच्या निकषांकडे दुर्लक्ष करत तसेच ऐन पावसाळ्य़ात कंपनीने मजुरांच्या मदतीने खोदकाम सुरू ठेवले. यामुळे रस्त्यावर मातीचे ढीग साचून पावसामुळे चिखल निर्माण होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी समोर आले. यादरम्यान, कंपनीने शहरात सर्वत्र मशीनद्वारे खोदकाम करण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी लावून धरली होती. यापूर्वी नगरसेवक अजय शर्मा, सुनीता अग्रवाल, सागर शेगोकार यांनी मनपाकडे रीतसर तक्रारी केल्या. नगरसेवकांच्या तक्रारीनुसार प्रशासनाने कंपनीला नोटीस जारी केली होती. तरीही कंपनीने खोदकाम सुरूच ठेवल्यामुळे अखेर महापौर उज्ज्वला देशमुख यांनी गुरुवारी प्रशासनाला पत्र दिले. या पत्राची दखल घेत शुक्रवारी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी एअरटेल कंपनीला तूर्तास काम बंद करण्याचा आदेश जारी केला.
मनपाच्या निर्णयावर आश्चर्य!
कंपनीच्या खोदकामावर महापौरांसह भाजप नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. महापौरांनी प्रशासनाला पत्र दिल्यानंतर प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रशासनाने धक्कातंत्राचा वापर करीत थेट काम बंद करण्याचा आदेश दिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रशासन व सत्ताधार्यांमधील ही मनोमिलनाची नांदी तर नसावी, याबद्दल तर्क वितर्कांना ऊत आला आहे.