Four deaths in 48 hours; 22 positive, 25 coronal free | ४८ तासांत चौघांचा मृत्यू; २२ पॉझिटिव्ह, २५ कोरोनामुक्त

४८ तासांत चौघांचा मृत्यू; २२ पॉझिटिव्ह, २५ कोरोनामुक्त

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असला तरी, मृत्यूचे सत्र मात्र सुरुच आहे. गत ४८ तासांत जिल्ह्यात आणखी चार कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोनाबळींची संख्या २७४ झाली आहे. या दोन दिवसांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २१ व रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्यांमध्ये एक असे एकूण २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,२६७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवार सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये सुंदर नगर येथील तीन, रामदास पेठ व जीएमसी येथील प्रत्येकी दोन जण, राऊतवाडी, सी. ओ. कॉलनी, मुकुंद नगर, राजंदा, गोरक्षण रोड, वरखेड बाशीर्टाकळी, आर. एस. हॉटेल रेल्वे स्टेशन, जुने शहर, डाबकी रोड, न्यू महसूल कॉलनी, आदर्श नगर, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

तीन पुरुष, एक महिलेचा मृत्यू
रविवारी बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडी महाल येथील ५८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. सोमवारी अकोट येथील दखनी फाईल भागातील ८० वर्षीय महिला, अकोला शहरातील गोकुळ कॉलनी, जवाहर नगर येथील ४० वर्षीय पुरुष व बाभुळगाव जहांगीर येथील ८५ वर्षीय पुरुष या तीघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२५ जणांना डिस्चार्ज
गत दोन दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २०, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून तीन, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून एक व हॉटेल स्कायलार्क येथून एक अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

४९४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,२६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,४९९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २७४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४९४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Four deaths in 48 hours; 22 positive, 25 coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.