गायकवाड हत्याप्रकरणातील चौघे कारागृहात

By Admin | Updated: October 18, 2014 00:51 IST2014-10-18T00:51:27+5:302014-10-18T00:51:27+5:30

भारती प्लॉटमधील सारंग गायकवाड हत्याप्रकरण.

Four convicts in Gaikwad murder case | गायकवाड हत्याप्रकरणातील चौघे कारागृहात

गायकवाड हत्याप्रकरणातील चौघे कारागृहात

अकोला : भारती प्लॉटमधील सारंग गायकवाड याची हत्या करणार्‍या चौघा आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची कारागृहात रवानगी केली. आरोपींना हजर करण्यापूर्वी न्यायालय परिसरात शस्त्रधारी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. छेडखानीच्या वादातून गुंड सारंग अशोक गायकवाड (२२) याची डाबकी रोडवरील मास्टर पॉवर जिमजवळ वानखडेनगरातील अभिषेक खरसाळे, संतोष चितोडे आणि सोपीनाथ नगरातील निखिल सहारकर, सतीश भोसले यांनी दगड व चाकूने वार करून त्याला जखमी केले होते. यात सारंगचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सुरक्षा व्यवस्थेत आरोपींना न्यायालयात आणले होते. डाबकी रोडचे ठाणेदार भारत रक्षाकर यांनी आरोपींना न्यायालयात हजर केले.

Web Title: Four convicts in Gaikwad murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.