दोन एकर भुईमुगाच्या पिकात चारली गुरे!
By Admin | Updated: May 28, 2017 03:59 IST2017-05-28T03:59:17+5:302017-05-28T03:59:17+5:30
भुईमुगाला शेंगाच न लागल्यामुळे दोन एकराच्या उभ्या पिकात चक्क गुरे चारली.

दोन एकर भुईमुगाच्या पिकात चारली गुरे!
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : भुईमुगाला शेंगाच न लागल्यामुळे गावातील संतोष पिलांत्रे या शेतकर्याने दोन एकराच्या उभ्या पिकात चक्क गुरे चारली. उत्पादन होत नसल्याने शेतकरी आर्थिक बाजूने खचून गेला आहे.
कपाशी, सोयाबीन, तूर व आता भुईमुगाला शेंगाच न लागल्यामुळे शेतकर्यांचे कंबरडेच मोडल्याचे दिसत आहे. भुईमूग पीक घरात आणेपर्यंंंत शेतकर्याला रात्रीचा दिवस करावा लागतो. महागडे बियाणे, खते, फवारणी, खुरपणी, डवरणी, सरी लावणे, डवरणी केली. एवढे करूनही भुईमुगाच्या झाडाला चार-पाच शेंगा पाहून शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. आता हे पीक हातचे गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. भुईमुगाला शेंगा कमी का? या बाबीकडे कृषी विभागानेसुद्धा फिरकून न पाहिल्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.