पाया खोदताना आढळला भूसुरुंग
By Admin | Updated: March 26, 2016 02:25 IST2016-03-26T02:25:34+5:302016-03-26T02:25:34+5:30
वाशिम जिल्ह्यातील गिरोली येथील घटना.

पाया खोदताना आढळला भूसुरुंग
गिरोली (जि. वाशिम): मानोरा तालुक्यातील गिरोली येथे इंदिरा आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचा शुक्रवारी पाया खोदताना भूसुरुंग आढळल्याने एकच खळबळ उडाली.
मानोरा तालुक्यातील गिरोली येथील सीताराम गायकवाड यांना इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले आहे. त्यांनी या घरकुलाचे काम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पायाचे खोदकाम सुरू केले. हे खोदकाम करीत असताना शुक्रवारी अचानक एका ठिकाणी १५ ते २0 फूट खोल असा भूसुरुंग आढळून आला. ही वार्ता गावात वार्यासारखी पसरली आणि हा खड्डा पाहण्यासाठी एकच गर्दी झाली. याबाबत गिरोलीचे पोलीस पाटील डाखोरे यांनी माहिती देताच गिरोलीचे तलाठी कांबळे व बिट जमादार नरवाडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.