उष्माघाताने भिका-याचा मृत्यू
By Admin | Updated: April 21, 2016 02:07 IST2016-04-21T02:07:23+5:302016-04-21T02:07:23+5:30
मलकापूर तालुक्यातील घटना.

उष्माघाताने भिका-याचा मृत्यू
बुलडाणा : उष्माघातामुळे मलकापूर येथील भिकार्याचा मृत्यू झाल्याची घटना २0 एप्रिल रोजी घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक भगवान सोनुने हे मलकापूर येथील रेल्वे स्टेशनवर पत्नीसह भीक मागत होते. १८ एप्रिल रोजी त्यांना उन्ह लागल्यामुळे मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात भरती केले होते; मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने २0 एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते; मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जिल्हाभरात सध्या तापमान वाढते असून, उष्माघाताचे प्रमाणही वाढत आहे.