वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

By Admin | Updated: June 5, 2015 23:46 IST2015-06-05T23:46:57+5:302015-06-05T23:46:57+5:30

तेल्हारा तालुक्यातील वाकोडी येथील घटना.

Fossil death of old age | वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

तेल्हारा ( जि. अकोला) : नजीकच्या वाकोडी येथील मधुकर धोंडुजी गव्हांदे या ६५ वर्षीय वृद्ध इसमाचा मृतदेह येथील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या आवारात ५ जूनला सकाळी आढळून आला. सदर इसमाचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याची माहिती तेल्हारा पोलिसांनी दिली. मधुकर गव्हांदेचा मृतदेह कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये आढळून आला असल्याबाबतची तक्रार पुरुषोत्तम खाडे यांनी तेल्हारा पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणाचा तपास जमादार गणेश उज्जैनकर व निरंजन भांगे करीत आहेत.

Web Title: Fossil death of old age