मनपाचे माजी सभापती पप्पू शर्मा यांचे निधन
By Admin | Updated: December 11, 2015 02:42 IST2015-12-11T02:42:49+5:302015-12-11T02:42:49+5:30
गुरुवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

मनपाचे माजी सभापती पप्पू शर्मा यांचे निधन
अकोला : महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे स्थानिक नेते, सुरेंद्र ऊर्फ पप्पू शर्मा यांचे गुरुवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शर्मा यांच्यावर काही दिवसांपूर्वी नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि गत आठवड्यापासून त्यांच्यावर स्थानिक खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. पप्पू शर्मा हे व्यवसायीक पी. के. शर्मा यांचे धाकटे बंधू होते. पप्पू शर्मा यांनी २0१0 ते १0१२ या दोन वर्षांच्या कालावधीत स्थायी समितीचे सभापती पद भुषविले होते. गतवर्षी त्यांना कावीळ झाला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावतच गेली. कवि असलेल्या पप्पू शर्मा यांचा शहरातील कविसंमेलनांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. मनपा सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असताना शर्मा यांच्या कवितांमुळे वातावरण निवळण्यास मदत होत असे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा शास्त्रीनगरस्थित राहत्या घरून उमरी स्मशानभूमीसाठी निघेल. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.