राज्य ग्रंथालय संचालनालयाचे माजी संचालक गणेशराव तायडे यांचे कोरोनाने निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST2021-05-05T04:30:58+5:302021-05-05T04:30:58+5:30
गणेशराव तायडे यांचा जन्म अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तेल्हारा येथे झाला. घरची परिस्थिती ...

राज्य ग्रंथालय संचालनालयाचे माजी संचालक गणेशराव तायडे यांचे कोरोनाने निधन
गणेशराव तायडे यांचा जन्म अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तेल्हारा येथे झाला.
घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. एकूण चार भावंडांपैकी ते सर्वांत मोठे होते. लहानपणीच त्यांना अपंगत्व आले. सुरुवातीपासूनच ते हुशार होते. त्यांचे महाविद्यालय शिक्षण डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर बी.लिब, एम.लिब करून ग्रंथालय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे काहीकाळ ग्रंथपाल म्हणून काम केले. त्यानंतर ते ग्रंथालय संचालनालय येथे तांत्रिक सहायक पदावर कार्यरत होते. पुढे याच क्षेत्रात ते ग्रंथालय निरीक्षक, सहायक ग्रंथालय संचालक, अमरावती, पुणे, मुंबई येथे कार्यरत झाले. त्यांच्या प्रगतीचा आलेख वाढतच गेला. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, तेल्हारा येथे ग्रंथालयाची स्थापना केली. अनेक सामाजिक संघटनांचे ते प्रतिनिधी होते. पुढे राज्य सेवा परीक्षा पास करून ते मुंबई येथे ग्रंथालय संचालक पदावर रूजू झाले. त्यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करून शासनाला वेळोवेळी पे स्केल रिपोर्ट सादर केले. ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मिळाली पाहिजे यासाठी ते झटले. ग्रंथालय चळवळीतील नेतृत्व, अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाने आज हिरावून नेले. त्यामुळे ग्रंथालय क्षेत्र पोरके झाले आहे.
फोटो: