शहरं
Join us  
Trending Stories
1
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
2
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
3
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
4
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
5
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
6
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
7
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
10
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
17
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
18
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
19
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
20
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पीक संरक्षणासाठी वनविभागाचे प्रात्यक्षिक

By admin | Updated: August 6, 2014 01:04 IST

शेतांमधील पिकांच्या होत असलेल्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे.

सायखेड: परिसरात वन्यप्राण्यांपासून शेतकर्‍यांच्या शेतांमधील पिकांच्या होत असलेल्या नुकसानीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेतला आहे. यादृष्टीने ४ ऑगस्ट रोजी परिसरातील धाबा येथील एका शेतकर्‍याच्या शेतात अरुणाचल प्रदेशातील वन्यप्राणी विशेषज्ज्ञ व वन्यजीव चिकित्सक डॉ. रुद्रा यांनी पीक संरक्षणात्मक उपाययोजना म्हणून राबविण्याच्या उपक्रमाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. धाबा येथील शेतकरी जालिंदर हातोले यांच्या शेतात सदर प्रात्यक्षिक करण्यात आले. यावेळी डॉ. रुद्रा यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले. वन्यप्राण्यांना पिकांच्या शेतापासून दूर रोखण्यासाठी सुकलेली मिरची गायी-म्हशीच्या शेणात मिसळून त्याच्या गोवर्‍या कशा बनवाव्या, याचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी या प्रयोगाची माहिती देताना त्यांनी शेतात वन्यप्राणी येतात अशा जागी सदर गोवर्‍यांचा धूर करावा, तसेच बोंद्रीच्या किंवा खादीच्या पोत्याच्या तीन कप्प्यात लाल मिरची गुंडाळून ती काठीला गुंडाळून काठीला बांधावी व त्याचा टेंभा करून तो धूर हवेत सोडावा. गाडीच्या इंजीनमधील ग्रीस व ऑईल सदर पोत्यावर ब्रशने घट्ट लावावे व त्यावर मिरची पावडर टाकून ते घड्या मारून बंद करावे. यानंतर वन्यप्राणी शेतात येण्याच्या वेळी संभाव्य ठिकाणी तारांच्या कुंपणास किंवा दोन काठय़ांना बांधावे. या वासामुळे व मिरचीच्या धुरामुळे वन्यप्राणी शेतात येत नसल्याचे डॉ. रुद्रा यांनी सांगितले. डॉ. रुद्रा यांनी या पीक संरक्षण उपक्रमाचे प्रात्यक्षिक महाराष्ट्रात १७७ ठिकाणी करून दाखविले आहे. ते मागील २४ वर्षांंपासून या उपक्रमाचा प्रसार करीत आहेत. धाबा येथील या प्रात्यक्षिकाच्या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) एम.डी. चव्हाण, बाश्रीटाकळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम. सुरजुसे,धाबाचे वनक्षेत्र सहायक यू.एम.चोरे, लोहगडचे मोहन भोसले, अकोलाचे कातखेडे,आकोटचे वनपाल, लाड, मूर्तिजापूरचे घुगे, वनरक्षक रश्मी भुजाडे, वैशाली कोहर, हरणे, एन.वाय. गवळी, एम.बी. देवकते, एस.आर. भिसे, एस.बी. नप्ते, सोनोने, वनकर्मचारी प्रभाकर पाटील, गणेश निमकंडे, लोखंडे, अनंता काकड, तसेच शेतकरी कैलास पाटील, गजानन पाटील, उमेश करवले, बबन इंगळे, समाधान चांभारे, भारत गालट, देविदास हातोले, हिंमत करवते, पुरुषोत्तम दहात्रे, संजय भारसाकळे, गजानन उंडाळ व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.