विदेशी दारूच्या बाटल्या जप्त

By Admin | Updated: March 10, 2017 02:39 IST2017-03-10T02:39:22+5:302017-03-10T02:39:22+5:30

विदेशी दारूच्या बाटल्या नेणा-या इसमास रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी पकडले.

Foreign liquor bottles seized | विदेशी दारूच्या बाटल्या जप्त

विदेशी दारूच्या बाटल्या जप्त

अकोला, दि. ९- माळीपुरा परिसरातील भगतसिंग चौकातून विदेशी दारूच्या बाटल्या नेणार्‍या आरोपीस रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी पकडले. त्याच्याकडून पोलिसानी ३३६0 रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. विजय नगरात राहणारा चंदन राजू घोगलिया हा विदेशी दारूच्या बाटल्या नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला पकडून त्याच्याकडून दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई रामदासपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत इंगळे, राजेश इंगळे, स्वप्निल खेडकर, श्रीकांत पातोंड यांनी केली.

Web Title: Foreign liquor bottles seized