शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दुकानाचा बेकायदा ताबा करणार्‍यांवर फौजदारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:15 IST

मोहम्मद अली रोडवरील दुकानामध्ये बुधवार, १५ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा   दुकानाचे कुलूप तोडून बेकायदा ताबा केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी ८ ते १0  जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देमंजूर इलाहीसह आठ युवकांविरुद्ध गुन्हाप्रभाव लोकमत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोहम्मद अली रोडवरील दुकानामध्ये बुधवार, १५ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा   दुकानाचे कुलूप तोडून बेकायदा ताबा केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी ८ ते १0  जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर  पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दखल घेऊन संशयितांवर गुन्हे दाखल  केले आहेत हे विशेष.अब्दुल हबीब अब्दुल सलाम (६0) यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या  तक्रारीनुसार मोहम्मद अली रोडवर हैदराबाद येथील शब्बीरभाई कादरभाई यांचे बेरार  सोडा फॅक्टरी नावाचे दुकान आहे. त्यांनी अब्दुल हबीब यांच्या वडिलांना व्यवसायाकडे  लक्ष देण्यासाठी मुखत्यार म्हणून नेमले होते. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अब्दुल हबीब हे  दुकानाचे काम सांभाळत असतानाच दुकानाचे मालक, अब्दुल हबीब आणि मूळ  भाडेकरू या तिघांमध्ये दिवाणी न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात  खटला सुरू आहे. दुकानाशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना, मालकाने हे  दुकान काही लोकांना विकले. मूळ मालकाने व त्याच्यापासून मालमत्ता विकत घेणार्‍या  व्यक्तीने मंजूर इलाही, सफवान, सलमान आणि गुंड प्रवृत्तीच्या ५ ते ६ युवकांना सोबत  घेऊन बुधवारी रात्री दुकानाचे कुलूप तोडले आणि दुकानाचा बेकायदा ताबा घेतला.  एवढेच नव्हे, तर दुकानात घुसून दुकानामधील फर्निचर, आठ फ्रिज, सोडा, लेमन  बनविण्याची मशीन, बर्फ बनविण्याची मशीन, कॉम्प्रेसर, बॉटल-कॅरेट १00 नग, दोन  मोबाइल व महत्त्वाचे दस्तावेज असा एकूण ४ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल या  युवकांनी पळविला. या प्रकरणाची तक्रार अब्दुल हबीब अब्दुल सलाम यांनी सिटी को तवाली पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी पूर्ण करून सदर आरोपींविरुद्ध  भारतीय दंड विधानाच्या कलम ४६१, ३८0 आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची दखलया प्रकरणाची वृत्तमालिका ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही  फुटेज शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी तपासले. त्यानंतर समोर आलेल्या  पुराव्यांच्या आधारे तसेच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर  गुन्हे दाखल केले आहेत.

संघटित गुन्हेगारीला चपराकसंघटित गुन्हेगारांनी या परिसरातील दुकानांवर बेकायदा ताबा घेण्याचे सत्रच सुरू  केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे; मात्र सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात  यामधील काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने संघटित गुन्हेगारांना चपराक बसली.

टॅग्स :Ramdas Peth Police Stationरामदासपेठ पोलीस स्टेशनAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा