शौचालय अनुदानाचा गैरवापर केल्यास फौजदारी
By Admin | Updated: November 14, 2015 02:23 IST2015-11-14T02:23:25+5:302015-11-14T02:23:25+5:30
अकोला महापालिकेचा निर्णय; ५00 लाभार्थींंच्या खात्यात रक्कम जमा.

शौचालय अनुदानाचा गैरवापर केल्यास फौजदारी
आशिष गावंडे / अकोला : ज्या कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय नाही, त्यांना शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. डिसेंबर महिन्यापर्यंंंत ३ हजार लाभार्थींंंचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट असून, सद्यस्थितीत ५00 लाभार्थींंंच्या खात्यात रकमेचा पहिला हिस्सा जमा करण्यात आला. शौचालयासाठी प्राप्त अनुदानाचा लाभार्थींंंनी गैरवापर केल्यास थेट फौजदारी स्वरूपाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्णअभियान अंतर्गत मनपा क्षेत्रात वैयक्तिक शौचालय नसणार्या कुटुंबांचा शोध घेऊन, त्यांना शौचालयासाठी अनुदान दिले जाईल. याकरिता पहिल्या टप्प्यात मनपाला अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्यामधून पात्र लाभार्थींंंना १२ हजार रुपयांचे अनुदान खात्यामध्ये जमा होणार आहे. लाभार्थीला १२ हजार रुपयांच्या अनुदानात स्वत:च्या जागेत सेप्टिक टॅँक बांधून, सीट बसवावी लागेल. यावेळी शौचालयांचे मॉडेल उपलब्ध करून देण्यासाठी काही व्यावसायिक सरसावले आहेत; परंतु ते प्रदीर्घ काळ टिकतील का, याचा विचार प्रशासनाला करावा लागेल. आजरोजी पात्र ५00 लाभार्थींंंच्या खात्यात पहिल्या टप्प्यानुसार सहा हजार रुपये जमा करण्यात आले असून, सेप्टिक टॅँकचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सहा हजार रुपये जमा होतील. लाभार्थींंंनी ही रक्कम इतर खासगी कामासाठी वापरल्यास थेट फौजदारी स्वरू पाची तक्रार दाखल करण्याचा निर्णय आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे.