फुटबॉल टेनिस स्पध्रेत वाशिम जिल्ह्याचे खेळाडू चमकले
By Admin | Updated: January 17, 2015 00:29 IST2015-01-17T00:29:11+5:302015-01-17T00:29:11+5:30
राष्ट्रीय शालेय फुटबॉल टेनिस स्पर्धेत चार रौप पदके.

फुटबॉल टेनिस स्पध्रेत वाशिम जिल्ह्याचे खेळाडू चमकले
वाशिम : दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय फुटबॉल टेनिस स्पर्धेत यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा सुपखेला या शाळेतील चार खेळाडूंनी रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. १७ व १९ वष्रे वयोगटात (मुले व मुली) सदर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आदी राज्यातून खेळाडूंनी सहभाग घेतला. महाराष्ट्रा तील एकूण १३ खेळाडूंनी रौप्य पदकं मिळविली आहेत. यामध्ये सुपखेला सैनिक शाळेतील चमु शुभम चव्हाण, अमोल अंभोरे, गणेश मुखमाले, शुभम कोल्हे, या विद्यार्थ्यांनी चार रौप्य पदक प्राप्त केली. खेळाडूंचे वाशिम येथे आगमन होताच मार्गदर्शक व शाळेच्या शिक्षकांनी यशस्वी खेळाडूंचा सत्कार केला. मार्गदर्शक तथा महाराष्ट्र फुटबॉल टेनिसचे प्रशिक्षक नारायण ढेंगळे, संस्थेचे सचिव तथा जि.प. उ पाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, दिलीप पाटील, मुख्याध्यापक एम.एस.भोयर, मेजर अमन थापा, एस.बी.चव्हाण व शिक्षकवृंदांनी खेळाडूंचा सत्कार केला.